‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ ही कादंबरी जे आपल्यासमोर घडते, पण त्याकडे आपण कळत-नकळत कानाडोळा करतो, त्याकडे सजग वृत्तीनं पाहण्यास प्रवृत्त करते
या कादंबरीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, त्यांच्या सद्यस्थितीला, त्यांच्यावर केल्या गेलेल्या अन्यायाला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून समजल्या गेलेल्या बळीराजाची व्यथा नव्या परिमाणाच्या माध्यमातून मांडली आहे. ती जाणून घेण्यासाठी आणि वेताळरूपी राजकीय नेत्यांनी बळीराजाची जी गत केली आहे, ती समजून घेण्यासाठी कादंबरी वाचणं गरजेचं आहे.......